थेट निवड करताहेत; कोण म्हणाले, मग सर्व प्रमुख जनतेतून निवडा

थेट निवड करताहेत; कोण म्हणाले, मग सर्व प्रमुख जनतेतून निवडा

-अजित पवार कडाडले

प्रतिनिधी
पुणे : सरपंच झालात याचा अर्थ तुम्ही गावचे कारभारी झाला आहात. यामुळे गावाचा सर्वांगीण विकास करणे तुमचे काम आहे. तुम्ही लोकांमधून सरपंच झाल्याने तुम्हाला एक मोठी संधी मिळाली आहे. मात्र, सरपंचाची निवड थेट जनतेतून करताय तर सभापती, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष अगदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवडही जनतेतूनच व्हायला हवी, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथे एका कार्यक्रमात सरपंच व

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सर्वांना सामान अधिकार दिला आहे. काही ग्रामपंचायतीत सरपंच वेगळ्या विचारांचा आणि सदस्य वेगळ्या विचारांचे निवडून येतात. यामुळे मोठी अडचण निर्माण होते. अशा वेळी एखादा ठराव करायचा झाल्यास एकमेकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होतो. मात्र असे असले तरी माझे सर्व सरपंचांना सांगणे आहे की सर्वांना सोबत घेऊनच पुढे चला. तरच गावाचा सर्वांगीण विकास होईल आणि जनतेलाही समाधान मिळेल.

-राजकारणात मैत्री जपणे महत्वाचे

शरद पवार हे गेली ५५ वर्षे राजकारणात आहेत. त्याकाळी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकमेकांवर वेगवेगळ्या प्रकारे टीका करायचे. पण ते भेटल्यावर एकमेकांसोबत खूप गप्पा मारायचे. कारण ते एकमेकांचे शत्रू नव्हते. त्यांनी राजकारण आणि मैत्री यात फरक ठेवला. विचारसरणी वेगळ्या असू शकतात. मतमतांतरे असू शकतात. मात्र यात कुठेही वैर असता कामा नये. आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा यशवंतराव चव्हाणांनी दिली. वसंतराव नाईक आणि शरद पवारांची शिकवण देखील तीच आहे. शरद पवार यांनी आजवर बेरजेचे राजकारण केले. कालच शरद पवारांनी शाहू महाराज छत्रपतींचा त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार केला.