का म्हणतात नेते, नवे राज्यपाल यांनी घटनेच्या चौकटीत काम करावे
-महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
प्रतिनिधी
मुंबई : राज्यपालाबद्दल दोन महिन्याअगोदर निर्णय घ्यायला हवा होता असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. तर हा उशिरा सूचलेला शहानपणा असल्याचा टोलाही संभाजीराजे छत्रपती यांनी लगावला आहे. तर नव्या राज्यपालांनी कोश्यारींच्या चुका लक्षात ठेवायला हव्यात आणि नव्या राज्यपालांनी राज्याची किर्ती सर्व राज्यापर्यंत पोहचवावी असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
–केंद्राच्या गृहमंत्रालयाचा दबाव
भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे एजंट म्हणून काम पाहिले. मात्र, यात त्यांचा दोष नाही. त्यांच्यावर केंद्राच्या गृहमंत्रालयाचा दबाव होता. मात्र आता नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे. राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय बनवू नये. अशी अपेक्षा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
–अखेर महाराष्ट्रातील घाण गेली
अमोल मिटकरी म्हणाले, उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपला कळल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
–बैस आहे की बायस माहित नाही
संजय राऊत म्हणाले, नवीन राज्यपाल रमेश बैस यांच्या नावात बैस आहे की बायस माहित नाही. मात्र नवीन राज्यपालांचे आम्ही स्वागत करू. मात्र, त्यांनी घटनेनुसार काम करावे. नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे, राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय बनवू नये. बैस हे सुस्वभावी आहेत. मात्र विरोधी पक्षाचा आवाज त्यांनी ऐकावा. राज्यात घटनाबाह्य सरकार आहे, न्यायालयात याची सुनावणी सुरू आहे. त्यांचे कोणते निर्णय मान्य करावे कोणते नाही, याचे भान त्यांनी ठेवावे.


