का काढले सुषमा अंधारेंनी शिवसेनेला बाळ दत्तक देण्याचे उद्गार ?
-वाचा सविस्तर बातमी
प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. परंतु, त्याच चिंता मला नाही. मी माझे पाच वर्षांचे बाळ शिवसेना पक्षासाठी दत्तक म्हणून देत आहे.
याबाबत उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. माझ्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या फायर ब्रँड
अंधारे यांनी आपल्या पाच वर्षांच्या बाळाबद्दलही चिंता व्यक्त केलीय. हे बाळ आपण शिवसेनेला दत्तक दिल्याचे भावनिक उदगारही त्यांनी काढले.सुषमा अंधारे म्हणाल्या की, माझ्या सोसायटीखाली दोन कॉन्स्टेबल येऊन बसले आणि त्यांनी मला सुरक्षा द्यायची असल्याचे सांगितले. याची माहिती मी उद्धव ठाकरे यांना दिली. याचा माझ्यावर तणाव होता. बाळाची चिंता वाटली. मात्र, त्याची जबाबरदारी घ्यायला शिवसैनिक तयार आहेत. त्यांनाच मी माझे बाळ दत्तक दिल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे म्हणत गुन्हे दाखल आहेत. याचा संदर्भ घेत अंधारे म्हणाल्या की, माझ्यावर गुन्हे दाखल केल्याने मी गप्प बसेल, असे तुम्हाला वाटत असेल. तर तुम्ही भ्रमात आहात. जागे व्हा, असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.
-राजभाऊंवर किती गुन्हे…
मी एका सामान्य घरातील कार्यकर्ती आहे. माझ्याकडे पैसाआडका काही नाही. मात्र, मी कोणालाही घाबरणार नाही. राज ठाकरे यांनी मिमिक्री केल्यामुळे आतापर्यंत त्यांच्यावर किती गुन्हे दाखल केले, असा सवालही त्यांनी केला.
-आक्रमक भूमिका सोडणार नाही
सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यातले त्यांचे भाषण चांगलेच गाजले. त्याच्या क्लीप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. त्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेबद्दल पोलिसांना चिंता वाटतेय.


