या विधेयकावरून शरद पवार थेट नरेंद्र मोदींच्या पाठीशी

या विधेयकावरून शरद पवार थेट नरेंद्र मोदींच्या पाठीशी

-खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच पक्षाची भूमिका स्पष्ट

प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीला पुन्हा एकदा धक्का दिला. संसदेच्या संयुक्त समितीवरील बहिfष्काराबाबत विरोधी पक्षांमध्ये एकमत होत असताना राष्ट्रवादीने मात्र त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांसह कोणत्याही मंत्र्याला गंभीर आरोपांखाली सलग ३० दिवस तुरुंगात राहावे लागल्यास त्यांना पदच्युत करणारे विधेयक काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने लोकसभेत मांडले. या विधेयकावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्यात आली आहे. इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी या समितीला तीव्र विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद द साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “या विधेयकाला आमच्या पक्षाचा विरोध आहे आणि तो समितीमध्ये सहभागी होऊनच व्यक्त केला जाईल. विधेयकांच्या विरोधात ठाम भूमिका घेत असतानाच संसदीय प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे”, असे सुळे यांनी स्पष्ट केले. “केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा मला फोन आला होता. त्यांनी आमच्या पक्षाला या समितीत सहभागी होण्याची विनंती केली. त्याबद्दल मी शरद पवार साहेबांशी चर्चा केली आणि आम्ही समितीमध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शवली. हा निर्णय पूर्णपणे पवार साहेबांच्या सल्ल्यानुसार आणि संसदीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग राखण्याच्या उद्देशाने घेतला गेला आहे,” असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.