आदित्य ठाकरे का म्हणाले, गृहमंत्री सांगा कोण ?
-विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बातचीत
प्रतिनिधी
नागपूर : राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना राज्याचा गृहमंत्री कोण आहे आम्हाला कळलेच पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केली.
परभणी येथील प्रकरण चांगले चिघळले आहे त्यावरून आम्ही आज सभा त्यागही केला. या कारणास्तव राज्याचा गृहमंत्री कोण आहे त्याला आम्ही विचारू शकू, हे महाराष्ट्राच्या जनतेला व सभासदांना कळलेच पाहिजे असे ते म्हणाले.
ईव्हीएमला आमचा विरोधच आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावा ही आमची मागणी असून आज संसदेमध्ये वन नेशन वन इलेक्शन या बिलावर मतदान झाले. तेव्हा बॅलेट पेपरचा वापर करण्यात आला. त्यातही बहुमत दिसून आले नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही सभागृहात प्रयत्न करणार आहोत. मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्षाचे 20 पैकी 13 मंत्री हे बाहेरचे आहेत. या संदर्भात आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षात खरे कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही.