नाना पटोले का म्हणाले, राज्यात राजकीय हत्यासत्र सुरू आहे
-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
प्रतिनिधी
नागपूर : ईव्हीएमच्या भरवशावर निवडून आलेले भाजपाचे माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांनी 9 कोटी रुपये चोरल्या प्रकरणी एका युवकाला अपहरण करून ठेवल्याची खळबळजनक माहिती आज नाना पटोले यांनी पत्रकारांना दिली.
या विरुद्ध सरकारविरोधात आवाज उठविणार असल्याचे ते म्हणाले. निवडणुका ईव्हीएमच्या भरवशावर जिंकल्यानंतर हत्येचे सत्र सुरू असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयस्पद होती. त्याबरोबर भाजपाचे जेष्ठ आमदार रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर वैभव नावाच्या युवकाला किडनॅप करून त्याच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा पटोले यांनी केला. त्यांच्यावर हा अत्याचार साडेचार कोटींची वसुलीसाठी करण्यात येत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. हे सरकार दलित, बहुजनांवर अन्याय करीत असल्याचा आरोप पटोले यांचा आहे.