हे मुख्यमंत्री बनणार पंतप्रधान : या भाजपा नेत्याचे मोठे वक्तव्य

हे मुख्यमंत्री बनणार पंतप्रधान : या भाजपा नेत्याचे मोठे वक्तव्य

-वक्तव्याची संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा

प्रतिनिधी
बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना उपपंतप्रधान करण्यात यावे अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी बुधवारी (तारीख ९ एप्रिल) केली. नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.

राष्ट्रीय स्तरावर त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांच्याकडे उपपंतप्रधानपदाची जबाबदारी दिल्यास मला आनंद होईल, असंही ते म्हणाले. माजी मंत्र्याच्या या मागणीची सध्या संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा रंगली आहे. नितीश कुमार यांची खरंच उपपंतप्रधानपदी वर्णी लागणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाचे नेते राज्याचा दौरा करीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३० मार्चला बिहारचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा केली. भाजपाच्या ८४ आमदारांनी पुढील सहा महिन्यांसाठी बूथ व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावं, असे निर्देश अमित शाहांनी दिले. एकीकडे बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून चर्चा होत असताना दुसरीकडे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने नितीश कुमार यांना थेट उपपंतप्रधान करण्याची मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपाची नजर?
नितीश कुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा पक्ष (जनता दल युनायटेड) भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे नितीश कुमार यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडने बिहारमध्ये ११५ जागांवर उमेदवार दिले होते, त्यापैकी केवळ ४३ जागांवरच पक्षाला विजय मिळवता आला. दुसरीकडे भाजपानं ११० जागा लढवल्या आणि ७५ उमेदवार निवडून आणले. मात्र, पक्षाने युतीधर्म पाळून नितीश कुमार यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. यंदा मात्र भाजपा मुख्यमंत्रिपदाचे लक्ष्य समोर ठेवूनच रिंगणात उतरेल अशी चिन्हे आहेत. गेल्या ११ वर्षांत भाजपानं उत्तर भारतात चांगलं बस्तान बसविलं आहे.

spot_img