एकच चर्चा : फडणवीसपेक्षा बावनकुळे यांच्या काळात अधिक नोंदणी

एकच चर्चा : फडणवीसपेक्षा बावनकुळे यांच्या काळात अधिक नोंदणी

-जगात क्रमांक एकच पक्ष असल्याचा दावा

प्रतिनिधी
नागपूर : भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी मोहिम सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात प्रदेश भाजपने केलेली नोंदणी ( १ कोटी ५१ लाख) ही फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष असतानाच्या वर्षापेक्षा अधिक असल्याचे खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच भाषणात सांगितले. याचा दुसरा अर्थ सदस्य नोंदणीत फडणवीसांपेक्षा बावनकुळे सरस असा होतो. त्यामुळेच बावनकुळेंच्या वक्तव्याच चर्चा सुरू आहे.

भाजप हा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, असे या पक्षाचे नेते सार्वजनिक कार्यक्रमात सांगत असतात. यासाठी सदस्य नोंदणीचे कोटींचे आकडे सांगितले जातात. सध्या पक्षाकडून सदस्य नोंदणीची मोहिम युद्ध पातळीवर राबवणे सुरू असल्याने त्याची चर्चा होणे अपेक्षितच आहे. त्यानुसार ती भाजपच्या स्थापना दिनी नागपुरात झालेल्या पक्षाच्या शहर कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमातही झाली.यावेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गकडकरी उपस्थित होते.

पक्षाचा स्थापना दिन आणि नव्या कार्यालयाचे भूमिपूजन हा योग साधून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सदस्य नोंदणीचा लेखाजोखा सादर केला. महाराष्ट्रात यंदा १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणी झाली. फडणवीस प्रदेशाध्यक्ष (२०१३-२०१५)असताना ती ७७ लाख झाली होती. याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले. ही आकडेवारी सदस्य नोंदणीत ते फडणवीस यांच्यापेक्षा बावनकुळे सरस ठरल्याचे दर्शवते.त्यामुळे ही बाब पक्षात चर्चेचा विषय ठरली.

 

spot_img