... अखेर माजी खासदारांसमोर पुजाऱ्याने घातले लोटांगण
-सध्या देवळीत शांतता
प्रतिनिधी
वर्धा : देवळी येथील राम मंदिर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळीस अखेर उपरती झाली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांचा इशारा मर्मी बसला. यामुळे पोलीस बंदोबस्तही हटला असून सध्या देवळीत शांतता आहे. माजी खासदार रामदास तडस यांना मिळालेली ‘अस्पृश्य’ वागणूक देशभर गाजली. त्याचे तीव्र पडसाद उमटले आणि विश्वस्त लोटांगण घालते झाले.
रामनवमीस भाजपाचे माजी खासदार रामदास तडस हे पत्नी शोभाताईंसह या मंदिरात पूजा करण्यास पोहचले होते. पण सोवळं नाही, जानवे नाही म्हणून तुम्हास गाभाऱ्यात प्रवेश नाही, असे त्यांना सुनावण्यात आले होते. त्याच दिवशी भाजपाचा स्थापना दिन असल्याने चांगली सुरुवात व्हावी म्हणून मंदिरात गेलेल्या रामदास तडस यांना अपमानीत होत माघारी फिरावे लागले. ही बाब सामान्य रामभक्तांच्या जिव्हारी लागली होती.
लगेच भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी रामदास तडस यांना अवमानीत केले याचा जाहीर निषेध नोंदवला. माफी मागा, अन्यथा मी राम मंदिरापुढे आत्मक्लेश आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी दिला.