हे कारण : लाडकी बहीणवरून भाजपा गिरवत आहे काँग्रेसचा कित्ता

हे कारण : लाडकी बहीणवरून भाजपा गिरवत आहे काँग्रेसचा कित्ता

-काँग्रेसचे अनिल वडपल्लीवर यांची याचिका

प्रतिनिधी
नागपूर : लाडकी बहीण योजनेसाठी होणाऱ्या खर्चामुळे इतर कल्याणकारी योजनांसाठी निधी शिल्लक उरणार नाही, असे सांगणारी याचिका न्यायालयात दाखल करणारे नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांना काँग्रेस समर्थक ठरवून ते योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहे, असा प्रचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अखेर वडपल्लीवर यांचीच भूमिका मान्य करीत वाढीव मानधन देण्याच्या आश्वसनाला लांबवरणीवर टाकला, असे बोलले जात आहे. सध्या आर्थिक स्थिती वाढीव मानधन देण्याइतपत सक्षम नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान वडपल्लीवार यांच्या याचिकेवरून भाजप व काँग्रेस यांच्यातराजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी उडाल्या होत्या.लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झालेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक आघाडी घेत पूर्ण बहुमताने सत्ताकाबीज केली. यासाठी कारणीभूत ठरली ती निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेली लाडकी बहीण योजना. या योजनेत लाभार्थी महिलेला दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती व महायुती सत्तेत आली तर हीच रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

सरकारच्या या योजनेला नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी नागपूर उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. राज्याची बिकट आर्थिक स्थिती लक्षात घेता लाडकी बहीण योजनेसह मोफत लाभाच्या इतर योजनांवर होणारा खर्च लक्षात घेता सार्वजनिक हिताची कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडे आवश्यक निधी शिल्लक राहणार नाही याकडे वडपल्लीवार यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते. मात्र तेव्हा (निवडणुकीपूर्वी) भाजपने या याचिकेचा पद्धतशीरपणे महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचारात वापर केला.

 

spot_img