यांनी केला मोठा दावा : अजितदादा व शरद पवार एकत्र!

यांनी केला मोठा दावा : अजितदादा व शरद पवार एकत्र!

-म्हणाले, जळगावमध्ये चांगले ज्योतिषी आहे का?

प्रतिनिधी
जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार काल एका बैठकीनिमित्ताने एकत्र आले होते. त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटीलही होते. जयंत पाटील आणि अजितदादा यांच्यात बंददरवाजाआड अर्धा तास चर्चाही झाली. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मीडियाने याबाबत विचारले असता भुजबळ यांनी थेट प्रतिक्रिया दिली. जळगावात चांगले ज्योतिषी आहेत. त्यांनाच या संदर्भात विचारतो, असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

छगन भुजबळ हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार का या संदर्भात मी आता जळगावमधील ज्योतिषांना विचारतो. जळगावमध्ये चांगले ज्योतिषी आहेत. असं होईल का? असं त्यांना विचारतो, असं सांगतानाच हे दोन्ही नेते एकत्र येतील की नाही मला माहीत नाही, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. आमचा पक्ष एक नंबर होत असेल ततर निश्चितच चांगलं आहे. भाजपचे आमदार सव्वाशे पेक्षा जास्त झाले आहेत. ते अधिक वाढतच आहेत. त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचे याचा विचार करूनच काम केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या बंददाराआडील चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील आणि माझीही अनेकदा चर्चा होते. विधानसभेत ते माझ्या बाजूलाच बसतात. आम्ही चर्चा कतो. आव्हाडही माझ्या बाजूलाच असतात. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. अजितदादा आणि जयंत पाटील यांनी चर्चा केली तर काय बिघडले? आम्ही शत्रू नाहीत आम्हाला धडा मिळालेला आहे. ते आमच्या विरोधी पक्षात आहेत. त्यांची मते वेगळी आहेत, आमची वेगळी आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं.

 

spot_img