या महिला नेत्याचा थेट इशारा, म्हणाले…शिकार करणारी मी

या महिला नेत्याचा थेट इशारा, म्हणाले…शिकार करणारी मी

-फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत

प्रतिनिधी
पुणे : गुरुवारी विधान परिषदेत चांगलाच राडा झाला. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. सुषमा अंधारे यांनी ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. आता सुषमा अंधारे यांची एक फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

पायाच्या दोन बोटात दगड पकडून मागच्या मागे दगड भिरकाऊन जागीच शिकार करणाऱ्या आदिवासी पाड्यावरची आहे मी. माझ्याकडे वाचवायला लाचखोरीतून जमा केलेला पैसा नाही. मुंबईसारख्या शहरात वाममार्गाने जमा केलेली प्रॉपर्टी नाही. माझ्याकडे प्रचंड जपायला माझं ईमान, शील आणि सत्व आहे. त्याच्यावर बोलणेच काय या शब्दांचा अर्थ कळण्याची ही तुमची योग्यता नाही.

चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.  यांची लायकी तीच आहे,  ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो, त्यांनी काल ज्या पद्धतीनं माझ्यावर ट्विट केलं. ते नेहमीच करतात. माझ्या कॅरेक्टरवर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो. वेडं-वाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो. आता विरोधी पक्षातले आधीचे सगळे बोलून -बोलून थकले. आता हे सुरू झाले आहेत. तुम्ही स्वत: ला काय समजता, तुम्ही आहात कोण? तुमची लायकी काय असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला आहे. एकूणच आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे.
spot_img