हे घ्या छप्पर फाड आरक्षण : या राज्यात ओबीसीना ४२ टक्के आरक्षण

हे घ्या छप्पर फाड आरक्षण : या राज्यात ओबीसीना ४२ टक्के आरक्षण

-विधेयक एकमताने मंजूर

प्रतिनिधी
तेलंगणा : तेलंगणा विधानसभेने राज्यातील ओबीसींना ४२ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक एकमताने मंजूर केले आहे. हे आरक्षण सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक संस्था आणि शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेसाठी लागू असेल.

तेलंगणा मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमाती विधेयक २०२५ आणि तेलंगणा मागासवर्गीय विधेयक २०२५ ही दोन्ही विधेयकं मांडण्यात आली. मागासवर्गीयांसाठी उप-जातीय आरक्षण मंजूर करण्यासाठी असलेले आणखी एक विधेयकसुद्धा सभागृहात मांडण्यात आले.

राज्य सरकारने केलेल्या जात सर्वेक्षणात मुस्लीम समुदायासह मागासवर्गीय लोकसंख्येचे प्रमाण ५६.३३ टक्के इतकं असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर काही महिन्यांतच हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

विधानसभेत चर्चेदरम्यान केवळ सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडूनच नाही तर भाजपा आणि भारत राष्ट्र समिती या विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळाला. विधेयक सादर करताना मागासवर्गीय कल्याण मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी म्हटले, “तेलंगणा विधानसभेतून आपण सर्व जण ४२ टक्के मागासवर्गीय आरक्षणाला पाठिंबा देत आहोत असा एकच आवाज आला पाहिजे… मागासवर्गीय समुदाय हा देशाचा कणा झाला आहे.”

 

spot_img