का म्हणाले ? मुख्यमंत्री, वार आडनाव आले की आम्ही हात जोडतो
-वडेट्टीवार असो की जोरगेवार
प्रतिनिधी
चंद्रपूर : हा “वारां”चा आणि “वाघां”चा जिल्हा आहे. सुधीर मुनगंटीवार आमचे नेते आहेत. वडेट्टीवार असो की जोरगेवार, कुठलाही “वार” असला तरी आम्ही स्वागत, व सन्मान करतोच करतो. ‘वार’ आडनाव आले की आमचे हात जोडूनच असतात. कारण आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे “हेडगेवार” यांचे अनुयायी आहोत अशी टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वडेट्टीवार यांना भाजपात या मंत्री करू अशी थेट ऑफरच दिली.
माजी मुख्यमंत्री कर्मवीर कन्नमवार यांच्या जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित कार्यक्रमात आज काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर चांगल्या कोट्या केल्या. या कार्यक्रमाला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित होते. याची सर्वत्र चर्चा होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा असून सहा पैकी तीन आमदार वार आहेत.वडेट्टीवार यांना कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी फोन केला तेव्हा त्यांनी जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही याबद्दल बोलतांना मुनगंटीवार किंवा जोरगेवार या दोन पैकी एक जण मंत्री पाहिजे होते असे सांगितले. मात्र, तिसऱ्या वारासाठी मंत्रीपद आहे आणि तिसरे वार वडेट्टीवार आहे असेही जोरगेवार बोलून गेले. वारांनी मंत्री व्हावे ही इच्छा आहे असेही जोरगेवार म्हणाले.
पालकमंत्री कोण अशीही चर्चा जिल्ह्यात सूरू आहे तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे अशीही विनंती जोरगेवार यांनी केली. यावेळी बोलतांना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, आमदार जोरगेवार हुशार आहे. जोरगेवार बाजूची खुर्ची घेण्यात हुशार आहे. काम कसे करायचे हे आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून शिकलो.फडणवीस साहेब तुम्ही देशाच नेतृत्व कराल तेव्हा कोणत्या ना कोणत्या वारांना सोबत ठेवा, आता जोरगेवार यांनी आपला नंबर पहिले लावला आहे आणि ते मला म्हणत आहेत की येता का दुपट्टा आणू का, मी मजा मारतो, आमदार होण्यासही जोरगेवार यांनी आमच्याकडून दुपट्टा घातला व आता मंत्री होतांनाही दुपट्टा आमच्याच कडून घालतो म्हणतात, मी फडणवीस यांना व्यक्तीगत भेटील तेव्हा जे काही मागायचे ते मागेल. मात्र आम्ही फोनवर बोलला त्या गोष्टीही जोगेवार यांनी येथे सांगून टाकल्या असेही वडेट्टीवार म्हणाले.
यानंतर मला फोन टेप करून ठेवावे लागेल. नाही तर जे बोललो नाही तेही सांगायचे. जोरगेवार यांचा मंत्री पदासाठी नंबर लागत असेल तर चांगले आहे असेही वडेट्टीवार म्हणाले . आमच्या सदिच्छा जोरगेवार यांच्या सोबत आहे. आम्ही विकासाच्या मुद्यावर सोबत आहे. फडणवीस यांचे कर्तत्वच असे आहे की त्यांना माता महाकाली सोबतच सर्वच देवींचा आशिर्वाद आहे. यावेळी फडणवीस यांनीही वडेट्टीवार यांना मंचावरच थेट भाजपात या अशी ऑफर दिली. वडेट्टीवार हे आमचे मित्र आहेत असेही फडणवीस म्हणाले.
पालकमंत्री कोण अशीही चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे अशीही विनंती जोरगेवार यांनी केली. यावेळी बोलताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, आमदार जोरगेवार हुशार आहे. जोरगेवार बाजूची खुर्ची घेण्यात हुशार आहे. काम कसे करायचे हे आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून शिकलो.फडणवीस साहेब तुम्ही देशाच नेतृत्व कराल तेव्हा कोणत्या ना कोणत्या वारांना सोबत ठेवा, आता जोरगेवार यांनी आपला नंबर पहिले लावला आहे आणि ते मला म्हणत आहेत की येता का दुपट्टा आणू का, मी मजा मारतो, आमदार होण्यासही जोरगेवार यांनी आमच्याकडून दुपट्टा घातला व आता मंत्री होतांनाही दुपट्टा आमच्याच कडून घालतो म्हणतात, मी फडणवीस यांना व्यक्तीगत भेटील तेव्हा जे काही मागायचे ते मागेल. मात्र आम्ही फोनवर बोललो. त्या गोष्टीही जोगेवार यांनी येथे सांगून टाकल्या, असेही वडेट्टीवार म्हणाले.
यानंतर मला फोन टेप करून ठेवावे लागेल. नाही तर जे बोललो नाही तेही सांगायचे. जोरगेवार यांचा मंत्री पदासाठी नंबर लागत असेल तर चांगले आहे असेही वडेट्टीवार म्हणाले . आमच्या सदिच्छा जोरगेवार यांच्या सोबत आहे. आम्ही विकासाच्या मुद्यावर सोबत आहे. फडणवीस यांचे कर्तत्वच असे आहे की त्यांना माता महाकाली सोबतच सर्वच देवींचा आशिर्वाद आहे. यावेळी फडणवीस यांनीही वडेट्टीवार यांना मंचावरच थेट भाजपात या अशी ऑफर दिली. वडेट्टीवार हे आमचे मित्र आहेत असेही फडणवीस म्हणाले.