राष्ट्रवादी काँग्रेसची बडी मुन्नी कोण? भाजपाच्या या नेत्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसची बडी मुन्नी कोण? भाजपाच्या या नेत्याचा आरोप

-संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद

प्रतिनिधी
बीड : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. तसंच या प्रकरणात वाल्मिक हे नावही चर्चेत आलं आहे. सुरेश धस यांनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा विषय लावून धरला आहे. तसंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बडी मुन्नी असा एक उल्लेख केला होता. ज्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी बडी मुन्नी कोण? हे सुरेश धस यांनाच विचारा. असं म्हणत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा सुरेश धस यांनी मुन्नी कोण हे मुन्नीला कळलं आहे आणि मुन्नी म्हणजे पुरुष आहे असं म्हटलं आहे.

सुरेश धस यांनी असा उल्लेख केला होता की, राष्ट्रवादीत मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा तू इथे ये. मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते. मला माहिती आहे आणि मुन्नीला माहिती आहे, मी कोणाबद्दल बोलत आहे. सुरेश धसांच्या या विधानानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या. आता सुरेश धस यांच्या या मुन्नीच्या विधानावर अजित पवार हे चांगलेच संतापले.

 

spot_img