अजितदादा गटाच्या या नेत्याचे मोठे भाष्य : म्हणाले, दोन्ही पवारांनी…!

अजितदादा गटाच्या या नेत्याचे मोठे भाष्य : म्हणाले, दोन्ही पवारांनी…!

-म्हणाले, नाराज आहेचा विषय सोडून द्या

प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाबत एक भाष्य केलं आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून ते नाराज आहेत कारण त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. याबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे.

नाराजी दूर करण्यासाठी सुनील तटकरेंचा तुम्हाला फोन आला होता का? असं विचारलं असता, मला काही कुणाचा फोन वगैरे आलेला नाही असं उत्तर छगन भुजबळ यांनी दिलं आहे. तसंच तुमची नाराजी दूर झाली आहे का? असं विचारताच छगन भुजबळ म्हणाले, “मी नाराज आहे, नाराज आहे असं रोज सांगत बसू का? तसं रोज रोज सांगत राहिलो तर लोक चॅनल पाहणं बंद करतील. तो विषय सोडून द्या.”

दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाचीही चर्चा रंगली आहे. कारण त्यातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा जवळचा असल्याने धनजंय मुंडेंचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी होते आहे. याबाबतही छगन भुजबळ यांना विचारलं असता कुणाचंही मंत्रिपद काढून मला मंत्री करु नये असं उत्तर भुजबळ यांनी दिलं आहे. भुजबळ म्हणाले, “कुणाचंही मंत्रिपद काढून मला ते मिळावं अशी अपेक्षा मी जन्मातही केलेली नाही, करणार नाही. मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. जी काही चौकशी होईल ती होईल, त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय करायचं ते पाहून घेतील. माझ्यासाठी कसलीही घाई करण्याचं काहीच कारण नाही.”

spot_img