संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा पवार कुटुंब पुन्हा एकत्र ?
-सांगितले हे ठोस कारण
प्रतिनिधी
मुंबई : अजित पवार यांनी जवळपास दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांची साथ सोडत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून दोन गट निर्माण झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात आक्रमक प्रचार केला. बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे लोकसभेत निवडून आल्या. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा पराभव केला. दरम्यान, निवडणुकांचा काळ संपल्यानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार, अशा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगल्या आहेत.
त्यामागचे कारण म्हणजे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी विठुरायाच्या चरणी केलेली प्रार्थना. आशाताई पवार बुधवारी (१ जानेवारी) पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला. आशाताई पवार म्हणाल्या की, “पवार कुटुंबांमध्ये जो काही वाद आहे, तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ दे, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी केली आहे. अजित पवार यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, असं साकडं देखील विठुरायाला घातलं आहे.”
एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्यातील संबंध ताणले गेलेले आहेत. त्यामुळे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे अजित पवार यांच्यावर वरचढ ठरले होते. मात्र, महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी जोरदार पुनरागमन केलं. शरद पवार यांच्या पक्षाने जेवढ्या जागा जिंकल्या, त्यापेक्षा दुप्पट जागांवर अजित पवारांनी विजय मिळवला.

निवडणुकांचा काळ संपल्यानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र यावे अशी प्रार्थना आशाताई पवार यांनी केली. इतकंच नाही तर, शरद पवार आणि अजित पवार यांचे मनोमिलन व्हावे, अशी इच्छा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बोलून दाखवली. एकेकाळी शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले अजित पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “शरद पवार हे आमचे दैवत आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. पवार कुटुंबीय एकत्र आले तर आनंद होईल. मी स्वतःला पवार कुटुंबातील सदस्य समजतो.