हे माजी मुख्यमंत्री म्हणतात, संघाच्या शाखेतून माझी सुरुवात

हे माजी मुख्यमंत्री म्हणतात, संघाच्या शाखेतून माझी सुरुवात

-संघ परिवाराशी माझे लहानपणापासून नाते

प्रतिनिधी
नागपूर : विधानसभेच्या नागपूर अधिवेशनानिमित्त प्रथेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महायुतीच्या आमदारांना गुरुवार (१९ डिसेंबरला) सकाळी ८ वाजता संघ कार्यालयात निमंत्रित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. याबरोबरच आपली सुरुवातदेखील संघाच्या शाखेतूनच झाल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “रेशीम बाग येथे मी पहिल्यांदा आलेलो नाही. यापूर्वी देखील आलो आहे. संघ आणि संघ परिवार यांच्याशी माझं नातं लहानपणापासूनचं आहे. संघाच्या शाखेतूनच माझी सुरूवात झाली. नंतर शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण हे सुरू झालं”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

spot_img