राज्यात येथे आहे आज मतदान : जि. प., पं. स.साठी सर्वांनी मतदान करा
-२ कोटी ८ लाख मतदार बजावणार हक्क
प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७, ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार या सर्व ठिकाणी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार या सर्व ठिकाणी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी सोमवारी मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होईल. सुरुवातीस या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर प्रचारसभा न घेण्याची भूमिका घेतली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला.
निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदांच्या व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या एकूण मतदारांमध्ये १ कोटी ६ लाख ३३ हजार २६९ पुरुष आणि १ कोटी १ लाख ८६ हजार ९६५ महिला; तर ४६८ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एकूण २५ हजार ४७१ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी सुमारे १ लाख २८ हजार अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात सुमारे १२५ निवडणूक निर्णय अधिकारी आणि १२५ सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


