ठरलंय ! रविवारी ठरणार या पक्षांचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार

ठरलंय ! रविवारी ठरणार या पक्षांचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार

-मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपा संसदीय मंडळाची रविवारी संध्याकाळी ६ वाजता बैठक होणार आहे, यामध्ये पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए शासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार २१ ऑगस्ट रोजी आपला अर्ज दाखल करतील. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

गुरुवारी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आगामी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवाराला अंतिम रूप देतील. संसद भवनात झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) च्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले होते.

जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, राम मोहन, लल्लन सिंग, अपना दल (एस) नेत्या अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले यांच्यासह एनडीएचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.