एकनाथ शिंदे यांच्याकडे या तारखेपर्यंत असेल धनुष्यबाण

एकनाथ शिंदे यांच्याकडे या तारखेपर्यंत असेल धनुष्यबाण

-शिवसेनेच्या या नेत्याचे मोठे भाष्य

प्रतिनिधी
मुंबई : पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष राहणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. येत्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल. याची भीती असल्यामुळेच सर्वोच्च

न्यायालयातील सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असून शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणीबाबत वारंवार तारखा दिल्या आहेत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

मुंबईत सभागृहात विरोधी बाकावर १०० पेक्षा जास्त नगरसेवक असणं हे सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे. या निवडणुकीत मराठी माणूस ठाकरेंच्या मागे आहे हे दाखवून दिलं, असं संजय राऊत म्हणाले. भाजपला कुठं जागा मिळाल्या, जिथं परप्रांतीय बहुसंख्य आहेत,ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहिली काय न राहिली काय? ज्यांना मराठी माणसाचं अस्तित्व या राज्याच्या राजधानीत अशा लोकांनी भाजप आणि शिंदेंना मतदान केलं. जो या मुंबईचा भूमिपुत्र मूळ मराठी माणूस आहे तो ठाकरेंच्या मागं राहिले आहेत याचा आनंद आहे, असं संजय राऊत म्हणाले. एवढंच नाही माझ्या हातात सत्ता दिली तर भाजपाचे १५ तुकडे करेन असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सध्या महाराष्ट्रात लोकांना पैशांची चटक लागली आहे. साखर कारखाने वाचवण्यासाठी अनेक लोक भाजपात जात आहेत. मराठी माणसाचं अस्तित्त्व जपण्यासाठी आक्रोश करणारी ही शेवटची पिढी आहे. पुढच्या पिढ्यांना काही फरक पडणार नाही. आम्ही मुंबईसाठी एकत्र आलो, ठाकरे एकत्र आले. मुंबईत मराठी नगरसेवक आम्ही निवडून आणले. मुंबई वेगळी करण्याचा प्रस्ताव आला तर हे नगरसेवकच लढणार आहेत, त्या दृष्टीने मी म्हणतोय की शेवटची लढाई आहे. मुंबईला सध्या पांगळं करण्यात आलं आहे. शाह आणि मोदींनी मुंबईचं महत्त्व कमी केलं. धारावीत जिथे जाल तिथे अदाणींचा बोर्ड दिसतोय. टोलनाक्यांवर अदाणींचा बोर्ड आहे. घाटकोपरला एक होर्डिंग पडून अपघात झाला आणि ४० लोक ठार झाले, त्या जागेवर आता अदाणींचा बोर्ड लागला आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.